अजय's blog

महिन्याची जाहिरातः उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२

Posted
Last updated
ago

गेल्या काही महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु केला आहे: महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.

सप्टेंबर २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे

उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२
जाहिरातदार आहेत विनय देसाई (मायबोली आयडी परदेसाई ). विनय देसाई गेली १० वर्षे मायबोलीकर आहेत.
या जाहिरातीतल्या काही योग्य गोष्टी पाहूया:
१) शीर्षक : उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२
अगदी मोजक्या शब्दात लक्ष वेधून घेणारे शीर्षक आहे.
२) मजकूरः

महिन्याची जाहिरातः १ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे

Posted
Last updated
ago

गेल्या महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु केला आहे: महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.

जुलै २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
१ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे
जाहिरातदार आहेत गणेश पाटील (मायबोली आयडी ganoba) आणि ते साडेचार वर्षांपासून मायबोलीकर आहेत.
या जाहिरातीतल्या काही योग्य गोष्टी पाहूया:
१) शीर्षक : १ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे

महिन्याची जाहिरातः मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

Posted
Last updated
ago

या महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु करतो आहोतः महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.

जून २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
जाहिरातदार आहेत मंजिरी वेदक (मायबोली आयडी manee) आणि त्या ७ वर्षांपासून मायबोलीकर आहेत.

या जाहिरातीतल्या काही योग्य गोष्टी पाहूया:
१) शीर्षक : मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
कार्यशाळा कुठे आहे आणि कुणासाठी आहे हे योग्य प्रकारे वापरले आहे. आणि टार्गेटेड आहे.

तुमचे ग्राहक कुठून येत आहेत तुम्हाला माहिती आहे का?

Posted
Last updated
ago

एक मित्र एका नवीन जाहिरात प्रकाराबद्दल सांगत होता. अरे अमुक तमुक प्रकारे जाहिरात केली म्हणजे नक्की ग्राहक मिळतात. मी म्हटलं "कशावरून" . तो बुचकळ्यात पडला. "कशावरून म्हणजे? इतके लोक तिथे जाहिरात करत असतात आणि माझ्या मित्रानेही तशी जाहिरात केली आणि त्यालाही खूप ग्राहक मिळाले. "

मी त्याला म्हटलं " ते सगळं बरोबर आहे आणि तो जगातला सगळ्यात चांगला जाहिरात प्रकार असेल आणि अनेक लोकांना त्याचा फायदाही झाला असेल. पण तुझे ग्राहक , त्या जाहिरात प्रकारामूळे, तू जे विकतो आहेस ते घेणार आहेत का? तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळालं हा फार महत्वाचा प्रश्न तू ग्राहकांना विचारतोस का? "

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना-४ : ठिकाण

Posted
Last updated
ago

प्रवासाशी निगडित नसलेल्या, ८०% टक्के छोट्या जाहिराती या स्थानिक वाचकांकडून वाचल्या जातात. उदा. पुण्यातला माणूस घर पाहताना आधी पुण्यातले घर पाहिल. आणि त्यातूनही तर तो कोथरूडमधे राहणारा असेल तर कोथरूड असे लिहलेली जाहिरात त्याचे लक्ष आधी वेधून घेईल. खूपदा जाहिरात लिहणार्‍या व्यक्तीचा असा मोघम समज असतो (आणि तो चुकिचा असतो) की ठिकाण लिहिले नाही तर ते माहिती करून घेण्यासाठी तरी जास्त प्रतिसाद येईल. पण तसे होत नाही. उलट तुमच्या छोट्या जाहिरातीत ठिकाण जितके जास्त माहितीपूर्ण दिले असेल तितका त्या जाहिरातीचा परिणाम जास्त होतो. प्रत्यक्ष पत्ता देऊ शकत असलात तर आणखी चांगले.

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- ३ : मजकूर

Posted
Last updated
ago

या अगोदर आपण पुरेसा मजकूर का महत्वाचा आणि शिर्षक या बद्दल वाचलं. या भागात मजकूर काय लिहावा याबद्दल वाचणार आहोत. हा भाग बराचसा छापील छोट्या जाहिरातींनाही लागू पडतो.

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- 2 : शीर्षक

Posted
Last updated
ago

एखादी छोटी जाहिरात तुमचे लक्ष का वेधून घेते? शीर्षकामुळे. जेंव्हा छापील जाहिरातींबद्दल लिहले जाते तेंव्हा शीर्षक सगळ्यात महत्वाचे मानले जाते. कारण आधी मोठ्या टायपातल्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले तर बाकीची जाहीरात वाचली जाणार.

मग आपल्या लेखमालेची सुरुवात आपण क्रमांक १ : शीर्षक अशी का नाही केली??
कारण ऑनलाईन शीर्षक महत्वाचे असले तरी त्याचे स्थान मजकुरानंतरचे आहे. ऑनलाईन छोट्या जाहिराती दोन प्रकारे पाहिल्या जातात.

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- १ : पुरेसा मजकूर का महत्वाचा?

Posted
Last updated
ago

छोट्या जाहिराती लिहताना (विशेषतः इंटरनेटवर)बर्‍याचदा जाहिरातदार पुरेसा मजकूर लिहत नाही. कधी कधी या जाहिराती फक्त काही शब्दात लिहल्या जातात.

उदा.
"मी फायनान्शियल कन्सलटंट आहे मला लिहा".
"मारूती गाडी विकणे आहे"

या जाहिराती फारशा परिणामकारक ठरत नाही. कारण..
१) नेटवरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचकाचे लक्ष. तुम्ही कितिही पैसे घातले तरी तुम्हाला ते Control करता येत नाही. आणि जर एखाद्या वाचकाने जर तुमच्या जाहिरातीवर क्लिक करण्याचे कष्ट घेतले असतील तर त्याला जर तुम्ही अधिक माहिती देत नसाल तर तुम्ही येणार्‍या ग्राहकाला तोंडावर दार आपटून बाहेर जायला सांगता आहात.

Subscribe to RSS - अजय's blog