महिन्याची जाहिरातः १ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे

महिन्याची जाहिरातः १ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे

Posted
Last updated
ago

गेल्या महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु केला आहे: महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.

जुलै २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
१ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे
जाहिरातदार आहेत गणेश पाटील (मायबोली आयडी ganoba) आणि ते साडेचार वर्षांपासून मायबोलीकर आहेत.
या जाहिरातीतल्या काही योग्य गोष्टी पाहूया:
१) शीर्षक : १ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे
अगदी सोप्या शब्दात काय विक्रीला आहे हे पटकन लक्षात येते. त्यामुळे या आकाराचे अपार्टमेन्ट हवे असेल तोच जाहिरातीवर टिचकी मारेल. टार्गेटींग योग्य आहे.
२) मजकूरः
बांधकाम कधीचे आहे, अपेक्षा काय आहे, संपर्क कसा करायचा याची योग्य ती माहिती दिली आहे.
३)ठिकाणः
ही जागा कुठे आहे याचे अगदी तपशीलवार वर्णन आहे. त्यामुळे ज्याला तो परिसर माहिती आहे त्याला लगेच लक्षात येण्यासाठी आणि नवीन माणसाला शोधण्यासाठी पुरेशी माहिती आहे.

जाहिरातदाराला अजून काय करता आले असते?
१) मजकूरः मजकूर थोडा कमी पडतोय. आणखी काही जास्त सांगण्यासारखे आहे का? कधी पासून जागा उपलब्ध आहे? जवळपास शाळा आहे का? इतर काही सोयी? पाण्याची उपलब्धता?
बिल्डींग किती मजली आहे? किती मोठी आहे? अजून किती बिर्‍हाडे आहेत? ब्रम्हा पार्क मधे अजून काय सोयी आहेत?
२)ठिकाणः
ठिकाणाबद्दल पुष्कळ माहिती असली तरी ती अर्धी मजकूरात आणि अर्धी खाली आहे. ब्रम्हा पार्क , २ रा मजला हे एकत्र खाली लिहता आले असते. मायबोलीवरच्या जाहिराती या मोबाईलवरूनही पाहिल्या जातात आणि जितके तुम्ही वाचकाला वरखाली कमी स्क्रोल करायला लावाल तितके जास्त चांगले.
३) जाहिरातीच्या खालीच फेसबुक आणि गुगल वर Like करायची सोय आहे. एका टिचकीसरशी जाहिरातदाराच्या माहितीतल्या लोकांपर्यंत ती पोहोचली असती. एक जाहिरातदार म्हणून तुम्ही तुमची जाहिरात facebook किंवा Google वर नोंदवून सुरवात करून शकता. 0 ते 1 हा प्रवास Likes साठी नेहमीच कठीण असतो. पण 1 ते अधिक थोडे सोपे असते.

यातले काही बदल अजूनही सहज करता येण्याजोगे आहेत.

महिन्याची जाहिरात म्हणून निवड झाल्याबद्दल गणेश पाटील यांचे अभिनंदन.