महिन्याची जाहिरातः मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
या महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु करतो आहोतः महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.
जून २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
जाहिरातदार आहेत मंजिरी वेदक (मायबोली आयडी manee) आणि त्या ७ वर्षांपासून मायबोलीकर आहेत.
या जाहिरातीतल्या काही योग्य गोष्टी पाहूया:
१) शीर्षक : मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
कार्यशाळा कुठे आहे आणि कुणासाठी आहे हे योग्य प्रकारे वापरले आहे. आणि टार्गेटेड आहे.
२) मजकूरः
वाचकाला कार्यशाळेबद्दल संपूर्ण माहिती जाहिरातीतून मिळते. संपर्क करण्यासाठी ईमेल आणि दूरध्वनी दोन्ही आहेत. इतकेच नाही तर पुढील कार्यशाळा भविष्यात असतील आणि कुठे असतील याची माहिती आहे. जाहिरात पुष्कळदा उशीरा लोकांना समजते. तसे झाले तरी त्या जाहिरातीचा परिणामकारक वापर होणार आहे.
जाहिरात मायबोलीकर आणि मायबोलीकर नसलेले दोन्ही पहातात. जाहिरातदाराने संपूर्ण नाव खाली दिले आहे. त्यांना यामागे व्यक्ती आहे हे कळते. त्यामुळे जाहिरातीची विश्वासार्हता वाढायला मदत होते.
जाहिरातदाराला अजून काय करता आले असते?
१) वेळः जाहिरात ज्या कार्यक्रमाविषयी आहे तो फक्त ७ दिवसात आहे. कदाचित अजून एक आठवडा आधी दिली असती तर जास्त लोकांच्या नजरेत पडली असती.
२)कोण तज्ञ आहेत त्यांची नावे दिली असती तर जाहिरातीला अधिक परिणामकारकता आली असती. त्या तज्ञांच्या ओळखीच्या व्यक्तींनी जाहिरात पाहिली तर अजून चार जणांना सांगून कानोकानी जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत झाली असती.
३) जाहिरातीच्या खालीच फेसबुक आणि गुगल वर Like करायची सोय आहे. एका टिचकीसरशी जाहिरातदाराच्या माहितीतल्या लोकांपर्यंत ती पोहोचली असती. एक जाहिरातदार म्हणून तुम्ही तुमची जाहिरात facebook किंवा Google वर नोंदवून सुरवात करून शकता. 0 ते 1 हा प्रवास Likes साठी नेहमीच कठीण असतो. पण 1 ते अधिक थोडे सोपे असते.
यातले काही बदल अजूनही सहज करता येण्याजोगे आहेत.
महिन्याची जाहिरात म्हणून निवड झाल्याबद्दल मंजिरी वेदक यांचे अभिनंदन.