ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- १ : पुरेसा मजकूर का महत्वाचा?

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- १ : पुरेसा मजकूर का महत्वाचा?

Posted
Last updated
ago

छोट्या जाहिराती लिहताना (विशेषतः इंटरनेटवर)बर्‍याचदा जाहिरातदार पुरेसा मजकूर लिहत नाही. कधी कधी या जाहिराती फक्त काही शब्दात लिहल्या जातात.

उदा.
"मी फायनान्शियल कन्सलटंट आहे मला लिहा".
"मारूती गाडी विकणे आहे"

या जाहिराती फारशा परिणामकारक ठरत नाही. कारण..
१) नेटवरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचकाचे लक्ष. तुम्ही कितिही पैसे घातले तरी तुम्हाला ते Control करता येत नाही. आणि जर एखाद्या वाचकाने जर तुमच्या जाहिरातीवर क्लिक करण्याचे कष्ट घेतले असतील तर त्याला जर तुम्ही अधिक माहिती देत नसाल तर तुम्ही येणार्‍या ग्राहकाला तोंडावर दार आपटून बाहेर जायला सांगता आहात.

जर तुम्ही जाहिरात लिहण्याचे कष्ट घेणार नसाल तर कुणी तुमची जाहिरात वाचण्याचे का कष्ट घ्यावेत?

२) नेटवर मजकूराला आणखी एक विशेष महत्व आहे. जितका मजकूर जास्त, तितके त्या मजकुरात सर्च इंजिनला सापडणारे शब्द जास्त. आणि तुमची जाहिरात सर्च मधे वर येण्याची शक्यता जास्त. म्हणजे तुमच्या कडे १० गोष्टी विकायला असतील आणि तुम्ही त्या ग्राहकाला आहेत हे सांगणारच नसाल तर तुम्हाला ग्राहक कसे मिळतील?

जास्त मजकूर लिहणे आवश्यक का आहे हे तुम्हाला पटले असेल, तर पुढचा प्रश्न मग नेमकं काय लिहायचं? आपण ते पुढच्या ब्लॉगपोस्ट मधे पाहणार आहोत.