Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

अ‍ॅग्रेसिव्ह - सामाजिक आशयाच एक बोल्ड नाटक

सध्या अनेक बोल्ड नाटकं रसिकांसमोर येत आहेत. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण नाटकं बोल्ड असणं पुरेसं नसतं. त्याचा आशय, विषय हा ही तितकाच सखोल असावा लागतो. तरच त्यातला सामाजिक आशय लोकांपर्यंत पोहोचतो. मल्हार निर्मित व साई एंटरटेनमेंट प्रस्तुत, निर्माते जे. विष्णु यांचं “अ‍ॅग्रेसिव्ह” हे अशाच एका सामाजिक आशयावरील नाटक दि. ८ फेब्रुवारी रोजी रंगमंचावर येत आहे. एक अ‍ॅग्रेसिव्ह पण तितकंच विचार करायला लावणार्‍या हया संगीतमय आशयघन नाटकाचे लेखन निनाद शरद शेटये यांचे असून दिग्दर्शन सुनील नाईक यांनी केले आहे. सेक्स किंवा संभोग हा मानवी जीवनाचा आनंददायी अविभाज्य घटक.

स्त्रीपुरुषांच्या संबंधातून नवीन प्रजोत्पादन हे नैसर्गिक सूत्र लक्षात ठेऊन ह्यासाठी विवाहाची मर्यादा अनादीकाळापासून समाजाने घातली आहे. पण हयाच आनंदाचं एक विकृतीकरण आजच्या तरुणाईत आढळतं. विवाहाआधी शरीरसंबंध सर्रासपणे सर्वत्र सुरू आहेत व याचा अतिशय विपरीत परिणाम समाजावर दिसून येतो. लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. ह्यावर अनेक चर्चा, लिखाण आणि ऊहापोह आजवर झाला आहे, पण मुलांना लैंगिक शिक्षण द्यावं की नाही यावर अजूनही एकमत होत नाही.

पण खरंच लैंगिक कृती, विकृती याबाबत समाज जागरूक झाला का ? सहज उपलब्ध होणार्‍या बीपीच्या सीडी, इंटरनेटवरील अश्लील वेबसाइटस, एमएमएस यासारख्या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने आजची तरुणाई लैंगिकतेच्या इतक्या आहारी गेली आहे की आज त्यांना लैंगिक विकृतीचं व्यसन लागलं आहे आणि ही लैंगिकता किती विकोपाला जाते ही बाब वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमातून रोजच्या रोज समोर येत आहे. या लैंगिकतेला बळी पडलेला तो किंवा ती स्वतःच तर नुकसान करतेच पण त्याचबरोबर त्याचं कुटुंबही उध्वस्त होतं. हयाचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. याचा नेमका परिणाम काय ? यावर “अ‍ॅग्रेसिव्ह” प्रभावीपणे भाष्य करते. पहाणार्‍याला अंतर्मुख करून विचार करायला लावणार्‍या या नाटकातून एक अतिशय प्रभावशाली संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. “अ‍ॅग्रेसिव्ह” हया नाटकाची कथा आहे रंजन या तरुणाची. एका सुसंस्कृत, सोज्वळ, खानदानी तरुणीशी त्याचा विवाह होतो. पण नेटसर्फिंग आणि अश्लिलतेच्या आहारी गेलेला रंजन तिच्यावर शारीरिक अत्याचार करतो. व तो अत्याचार सहन न झाल्याने ती घर सोडून निघून जाते. अशावेळी आपल्या वासनेवर ताबा न ठेवता आल्याने तो एक दिवस कॉलगर्लला घरी बोलवतो. त्यानंतर काय होत याचं प्रत्ययकारी चित्रण हया नाटकातून करण्यात आले आहे.

संतोष वाजे निर्मिती प्रमुख असलेल्या हया नाटकात दोन गाणी असून ती अमोल कांबळे यांनी संगीतबद्ध केली आहेत. या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन राहुल काळे यांनी केले आहे. पार्श्वसंगीत आशीष केळकर, नेपथ्य अशोक पालेकर, रंगभूषा जगदीश शेळके,वेशभूषा स्वाती पाटील तर संदीप दळवी हे सुत्रधार आहेत. या नाटकात गौरी पाटील, रसिका धामनकर,वैभव सातपुते आणि मौसमी तोंडवळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.