सुज्ञ मायबोलिकरानि चुकवु नये असा आविस्मरणीय अनुभव !!!
We-चार....
We-चार....
"लोक विचार करायला घाबरतात... कारण विचार केला.. की प्रश्न पडतात... आणि त्या प्रश्नांची उत्तरे.. परवडत नाहीत"
ह्या विचाराने अस्वस्थ झालेले चार मराठी कवी एकत्र आले...
विविध विषयां वरील आपल्या मराठी / हिंदी कविता लोकांपुढे सादर करून.. एक वैचारिक संवाद साधावा हा ह्या हेतु ने एक अभिनव कार्यक्रम आखला... कार्यक्रमा चे नाव "We-चार"
विविध क्षेरात कार्यरत असलेले चार मित्र.. कवितेच्या तरल धाग्याने बांधलेल़े..
चौघांच्या कवितेचा बाज नीराळा.. विषय निराळे.. पण सादरीकरणातली सहजता.. उत्कटता आणि मनास्वीता सारखीच...
म्हणूनच "We-चार" मधल्या कवितांचा एक एक शब्द मनाचा वेध घेतो...
'We-चार' चा शुभारंभाचा प्रयोग १९ जून 2०११ रोजी रविन्द्र नाट्य मंदिराच्या पु ल देशपांडे सभागृहात झाला. ह्या पहिल्या प्रयोगाला..रसीक प्रेक्षकांनी तर मना पासून दाद दिलीच.. पण प्रसिध्ही माध्यमाने ही त्याची दखल घेतली... २ तास एका वेगळ्याच विश्वात घेउन जाणारा हा अनुभव... कधी मनमुराद हसवणारा.. कधी डोळ्याच्या कडा ओल्या करणारा... तर कधी.. अंतर्मुख करणारा...
४ अस्सल कवींना मिळाला एक विचारी निर्माता आणि सुरू झाला एक अविस्मरणिय काव्यानुभव ’ we-चार ’....रसिकांच्या सोबतीन प्रवास रंगत गेला. मान्यवरांची दाद आणि प्रेक्षकांचा पाठीवर हात ह्या मातब्बर कमाईवर आज WE-चार ने आपलं एक वर्ष पूर्ण केलं आहे.
कवितांचा कार्यक्रम म्ह्णून नाक मुरडणा-या तरुणांच्या पिढीतलेच हे कवी
ते स्वत: ...कविता करतात ...कविता जगतात ...आणि म्हणूनच कविता म्हणजे कंटाळा मानणा-या पिढीच्याही काळजापर्यंत कविता पोहोचवतात
असं काय आहे ह्या कार्यक्रमात की १७-१८ वर्षांची साहित्यात रस ही नसणारी मुलं देखील हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा बघायला येतात आणि दर वेळी मित्रांचा वाढता गोतावळा घेउन येतात !
कवी आणि संगीतकार यशवंत देव म्हणतात ” मराठी कवितेच्या प्रेमाने तुमचा हा प्रयत्न भारलेला आहे.. माय मराठीच तुम्हाला आशीर्वाद देईल ”
असं काय आहे ह्या कार्यक्रमात की जेष्ठ संगीतकार आनंद मोडक म्हणतात ”असा कार्यक्रम मागच्या १५ वर्षात मी पाहिलेला नाही”
असं काय आहे या कार्यक्रमात की ज्याची दखल सह्याद्री वाहिनीवर घेऊन जेष्ठ पत्रकार नितीन केळकर म्हणतात ” WE-चार आवडला.... प्रचार व्हावा....प्रसार व्हावा ’
हा कार्यक्रम असं काय सांगतो की गझलनवाज भिमराव पांचाळे म्हणतात ”आजच्या उथळ कार्यक्रमांच्या गर्दीत असा गहीरा WE-चार हवाच ”
हा कार्यक्रम अशी काय जादू करतो की कवी चंद्रशेखर गोखले म्हणतात ” तुमच्यासाठी आम्ही जिवाचे कान करून बसलोय ”
ह्या WE–चार मधे असं आहे तरी काय की नंदू घाणेकरां सारखा हरफ़न मौला म्हणतो ” हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा तिकीट काढून बघावा ”
लहू पांचाळ, माधव आजगावकर, राजा वालावलकर ह्या संगीतकार त्रिकुटाला प्रत्येक कार्यक्रमास हजेरी लावावीशी वाटते त्याचं नेमकं कारण तरी काय आहे ?
फक्त शब्दांच्या ताकदीवर प्रेक्षकांना दोन अडीज तास खिळवून ठेवणारा हा उपक्रम सुंदर आहे... असं अगदी आजच्या तरुणाईचं प्रतिनीधीत्व करणारा गायक जयदिप बगवाडकर आणि गीतकार अश्विनी शेंडे-बगवाडकर यांना का वाटतं ?
जाती पातीच्या दंगलींपासून ते जात्या वरच्या ओव्यांपर्यंत अनेक विषयांची एकत्र गुंफ़ण करणारा आणि वय वर्ष १७ ते ७० च्या प्रत्येक तरूण काळजाला हात घालणारा हा कार्यक्रम आहे तरी कसा ?
असे ह्या We-चारांमध्ये काय आहे..
WE-चारी मना तू ची शोधूनी पाहे ..
सुजीत शिंदे प्रस्तुत
we-चार ! एक अविस्मरणीय काव्यानुभव
प्रयोग क्र. ३०
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह , बोरीवली (पश्चिम), मुंबई
शनिवार दि. २० जुलै . रात्री ८ वाजता
(मायबोलिकर असल्यचा उल्लेख करवा)
*तिकिट विक्री सुरु* ९९६०९६०८८२, 9820178158, 9920240482
https://www.facebook.com/pages/We-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/200714293308322?hc_location=timeline