Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

मराठी पॉपकॉर्न आता राणीच्या राज्यात !!!

नमस्कार Global मायबोलीकर मित्रांनो ,

गेल्या चार पाच वर्षांपासून 'मायबोली ' ची नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मायबोली' चा आवाका खूपच प्रचंड आहे.कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच खुप उपयोगी पडते.

तुम्हाला सर्वाना, एक आनंदाची बातमी देण्यासाठी ह्या पोस्ट चा खटाटोप.. आपल्या मधल्याच काही उत्साही मराठी लोकांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. देशाबाहेरच्या, खास करून UK मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या screen वर सादरीकरण करण्याचा !

चांगले मराठी सिनेमा पाहण्याची ओढ आणि त्या साठी पाहावी लागणारी वर्षभराची वाट, छोटी स्क्रीन व pirated कॉपी चा निषेध, आणि कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने चांगले मराठी सिनेमे बघता न येणं हि खंत त्या उद्देशाला पुढे न्यायला पुरेशी ठरली, आणि सुरु झाली तयारी..
बजेट, कॉन्टॅक्टस , मार्केटिंग, थिएटर्स, production हाऊसेस, मराठी communities अशा कितीतरी चर्चा झाल्या, आणि हळू हळू वेग वाढू लागला. पहिल्या पायरी वर आम्ही "Half Ticket" काढलं.म्हणजे....

** Marathi Popcorn हि टीम आता घेऊन येत आहे "Half Ticket" ह्या सिनेमाचा UK wide screening. **
येत्या २१ ऑगस्ट २०१६ ला UK मधील १२ Cineworld थिएटर्स मध्ये Half Ticket सादर होतोय.

आमच्या कडून आम्ही सगळ्याना चांगल्या सिनेमा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्याउपक्रमाला आम्हाला साथ द्यायला बरेच मराठी celebrities सुद्धा पुढे आले आहेत ..

आता साथ हवीये फक्त तुमची सगळ्यांची !

आमच्या फेसबुक पेज वर तुम्ही आम्हाला support करू शकता.

तुम्ही "Half Ticket" हा सिनेमा पहिला असेल तर, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या, आमच्या फेसबुक पेज वर !
तुमच्या UK मधल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक याना सिनेमा recommend करा , त्यांना पण सांगा ना "Half Ticket" आणि Marathi पॉपकॉर्न बद्दल !

आपल्या मराठी सिनेमाचा आनंद आता UK मध्ये तो हि मोठ्या स्क्रीन वर घेऊयात... येताय ना मग "Half Ticket" बघायला फुल्ल तिकीट काढून.. :)

तुम्ही खालील लिंक्स वरून आमच्याशी संपर्क साधू शकता, like करा, share करा आणि प्रेमाने support करा ...

www.marathipopcorn.com
https://www.facebook.com/marathipopcorn

Tickets Booking : http://www.marathipopcorn.com/#!tickets/vyj3b

Location: 
UK
United Kingdom
GB

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.