Submitted by मिलन टोपकर on Sat, 12/05/2015 - 01:35
सिद्धह्स्त लेखक आणि दिग्दर्शक श्री. रत्नाकर मतकरी ह्यांचे ७५वे नाटक म्हणजे तीन अंकी महानाट्य "इंदिरा". आणीबाणी ते मृत्यू ह्या इंदिरा गांधी ह्यांच्या आयुष्यातील शेवटच्या नऊ वादळी वर्षांची रोमहर्षक कथा म्हणजे "इंदिरा". सुप्रिया विनोद, विक्रम गायकवाड, नकुल घाणेकर, पूर्वा नीलिमा सुभाष आणि अनेक कलाकारांच्या अभिनयाने नटलेले हे नाटक, राजकीय नसून इंदिरा गांधी ह्या व्यक्तीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेते. रविवार १३ डिसेंबर रोजी कोथरूड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता ह्या नाटकाचा प्रयोग आहे. अवश्य या.
Classified-category:
Location:
India
IN
शेअर करा