"स्मृतिगंध काव्य गौरव पुरस्कारा करिता प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन."
साहित्य सागर साहित्य संघ व मनविसे मेहकर यांच्या संयुक्त विध्यमाने
जागतिक मराठी भाषा दिन व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिना
निमित्त स्मृतिगंध काव्य गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी
महाराष्ट्रातील मराठी भाषिक नवोदित कवी कडुन या पुरस्कारा करिता
प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
प्रवेशिका पाठवितांना विषयाचे बंधन न बाळगता दोन कविता, अल्पपरिचय, दोन
पोस्टकार्ड, पाच रु. चे पोस्टाचे तिकीट दि. 30 जानेवारी 2014 पर्यंत
अमोल ज्ञानदेव टेकाळे,
संस्थापक अध्यक्ष- साहित्य सागर साहित्य संघ, सुबोध मराठी प्राथ. शाळे
जवळ, इंदिरा नगर, मेहकर, ता. मेहकर जि. बुलडाणा. या पत्यावर
पाठविण्याचे आवाहण करण्यात येत आहे.
पुरस्कारा करिता प्राप्त झालेल्या प्रवेशिकेतुन प्रथम तिन क्रमांकाना
स्मृतीचिन्ह व सन्मानपञ देऊन गौरविण्यात येईल. तसेच विशेष उत्तेजनार्थ 15
व उत्तेजनार्थ 25 कविंना आकर्षक सन्मानपञ देवून गौरविण्यात येईल.