आजच्या घडीला हुशारीबरोबर व्यक्तीमत्त्व विकासही महत्त्वाचा झाला आहे. तुमचं दिसणं, वावरणं ह्या सध्याच्या युगात अति-महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्यासाठी मोठे झाल्यावर पाऊल टाकण्यापेक्षा, त्याची सुरुवात लहान वयातच केली, तर त्याचा पूढे जाऊन नक्कीच फायदा होऊ शकतो. तसेच व्यक्तिमत्त्व विकास हा फक्त बाह्य स्वरुपाचा न रहाता अंतर्गतही होणं महत्त्वाचा आहे. आणि हाच विचार घेऊन ‘वेध ऍक्टिंग अकॅडमी’च्या यंग बिग्रेडनी खास मुलांसाठी यंदाच्या नाताळच्या सुट्टीत व्यक्तिमत्त्व शिबिर आयोजित केलेले आहे. नवीन वर्ष सुरु होताना, विकासाकडे मुलांचं नवीन पाऊल पडावं हाच हाच याचा मूळ उद्देश!
अभ्यासामुळे कंटाळलेल्या मुलांच्या मनाला त्यायोगे एक टॉनिक द्यावं आणि म्हणूनच व्यक्तिमत्त्व ख-या अर्थाने विकसित होण्यासाठी नाटक आणि कला हे माध्यम निवडलेलं आहे. खेळातुन विकास हेच सुत्र ही यंग बिग्रेड अवलंबणारे. त्यासाठी खास पालकांचही एक लेक्चर घेतलं जाणारे जेणेकरुन मुलांबरोबर पालकांनाही त्याचा फायदा व्हावा.
व्होल ब्रेन टिचिंग थेरपी
‘गप्प बसा’ ह्या आपल्या शिक्षणाच्या संस्कृतीत मुलांना रस घेउन शिकावसं वाटेल असं फार कमी वेळा दिसतं. आणि म्हणूनच ह्या शिबिरात व्होल ब्रेन टिचिंग थेरपीचा अवलंब ही यंग बिग्रेड करेल. मुलांना हसतं- खेळतं आणि सतत रस घेउन शिकायला आवडेल अशा पद्धतीचा अवलंब ह्यात केलेला असतो. ‘ज्यामुळे मुलं कंटाळतही नाहीत आणि खेळाबरोबर शिकणही होतं.
नृत्यातुन मेडीटेशन, सकारात्मक विचार, मैत्री, सहाय्य असे वेगवेगळे विषय या शिबिरात हाताळले जाणारच असून २५ ते ३१ डिंसेबर संध्याकाळी ५ ते ८ गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये हे शिबिर घेतले जाईल. सहभागासाठी संपर्कः रमा पटवर्धन ९८३३५७७४११
शिबिराचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे:
Personality Development
Positive & Critical Thinking
Friendship
Enemy
Parent- Child Coordination
Meditation through Dance
Theater
Theater Technique
Acting
Voice Culture
Diction
Camera