ही आहे मैत्रीची मैत्रीसाठी हाक. Cambridge / Boston भागामध्ये महिन्यातून एक-दोन वेळा तरी सर्वांनी वेळ काढून भेटावे ही अपेक्षा. वयाची अट नाहीच, पण ज्येष्ठ नागरिकांना फार धावपळीचे, दगदगीचे होणार नाही असे समविचारी सम आवडीचे आपण सगळे भेटूया. ह्या आपल्या मैत्रीमेळ्यात प्रामुख्याने चांगले वाचन - कविता, लेख, अभंग, स्फुटलेखन, असे अनेक प्रकार येतील. कुणाला योगासन, गाणी, खेळ (पत्ते, सुडोकू … ) असे आपापल्या आवडीचे छंद बाकीच्यांना शिकवायचे असतील तर अजूनच मजा. श्रोते आहेतच. कधीतरी नुसत्या गप्पा मारण्यासाठी भेटूया. सुरुवात तर करूया …
रविवार २० ऑक्टोबर चा पहिल्या भेटीचा मुहूर्त आहे. ह्या शुभारंभाच्या वेळीस सौ पुष्पा लेले आपल्याला त्यांच्या पुस्तक संघा बद्दल थोडी माहिती सांगतील. पुष्पा ताई मागचे सहा वर्ष आपल्या मैत्रीणींबरोबर पुस्तक संघ चालवत आहेत. त्यांच्या अनुभवांचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.
ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया RSVP करा.
भेटीची वेळ: २० ऑक्टोबर 1.30 pm.
भेटीचे ठिकाण: 165 Pleasant Street, Cambridge, MA 02139.
Landmark: Trader Joe's or Courtyard Marriott on Memorial drive in Cambridge.
Parking: Free street parking available on Sundays.
Email: CambridgeChaKatta@gmail.com ,
Phone: 6506665835 (Shubhangi Fadnavis)
काही शंका विचारणा असेल तर वरील फोन नंबर किंवा ईमेल अड्रेस वर कळवावे. काही कारणाने २० ऑक्टोबर जमत नाही पण मेळ्यामध्ये सामील व्हायचे असेल तर आपल्याला कोणता दिवस सोयीचा असेल ते कळ्वावे. बहुमताने तारखेत बदल होऊ शकतो. किंवा २० ऑक्टोबरला काय काय घडले ते अनुपस्थित असलेल्यांना कळविण्यात येईल.
Maitree Mela