Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

फक्त आपणांसारख्या विशेष निमंत्रितांसाठी एक आगळावेगळा प्रकाशन समारंभ:- मी मुंबईकर!

पायाला लागली चाके,
घड्याळावर चाले आयुष्य II
२४ तास माझे शहर धावते,
कमी होत चालले आहे आयुष्य II
वेग आमचा ध्यास आहे,
भले दिशाहीन होते आयुष्य II
पैसा आमचा दैवत झाला,
खऱ्या आनंदाला पारखे आयुष्य II
गप्पांची जागा सिरियलने घेतली,
घरपण हरवते आहे आयुष्य II
आनंदाच्या व्याख्या बदलल्या,
मल्टिप्लेक्स व मॉलमध्ये जाते आयुष्य…. II
हसण्यासाठी टि. व्ही. कार्यक्रम हवेत,
साचलेपणाने भरले आयुष्य II
घटनांचा प्रवाह कमी झाला,
तोचतोचपणाने कंटाळले आयुष्य II
चाळी गेल्या….टॉवर आले,
flatमध्ये बंदिस्त आयुष्य II
शेजारपणाचा मोकळेपणा घालवून,
बंद दरवाज्यातून सलते आयुष्य II
ओळखलेत ना, मी कोण?
मी आहे कदाचित तुमचा आरसा …. मुंबईकर II

मुंबईकरांचे उदाहरण घेऊन, मानवी स्वभावाचा व वर्तणुकीचा घेतलेला एक वास्तव वेध….
जागतिकरणाच्या वेगामध्ये संस्काराचा ब्रेक व यशाचा एक्स्लेटर यांच्यात दुवा साधून देणारे - गोंधळलेल्या मनाला योग्य दिशा देणारे - तरुणतरुणींपासून ते आजीआजोबांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारे - राजकारणी-उद्योजक ते चाकरमानी या सर्वांच्या संदर्भासाठी योग्य - केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रातील-देशातील प्रत्येक शहरातील प्रत्येकासाठी प्रोत्साहनात्मक व मार्गदर्शनपर पुस्तक….
दैनिक सकाळ मधील श्री. बिपिन मयेकर यांच्या गाजलेल्या लोकप्रिय साप्ताहिक सदरातील लेखांचे संकलन:
पल्लवी फौंडेशनतर्फे प्रकाशित होणारे एक महत्वाचे पुस्तक - मी मुंबईकर!

एक आगळावेगळा प्रकाशन समारंभ:
फक्त आपणांसारख्या विशेष निमंत्रितांसाठी!
दिनांक १ जून २०१३ रोजी; सायंकाळी ७ ते ९
स्थळ: केदारनाथ मंदिर सभागृह, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई ४०००२४

Location: 
केदारनाथ मंदिर सभागृह
नेहरू नगर कुर्ला (पूर्व)
४०००२४ मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.