गायत्री'ज टॉयब्ररी, शनिवार पेठ येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत खालील छंदवर्ग आयोजित करण्यात आले आहेत.
सर्व शिबिरांसाठी आगाऊ नावनोंदणी आवश्यक.
संपर्कः गुणेश - ९८९०६४४६३६, toybrarypune@gmail.com
www.toybrarypune.com
१. गंमत शिबिर
वयोगटः ३ ते ६ वर्षे
तारीखः ४ एप्रिल ते १४ एप्रिल
वेळः स. ९:३० ते ११:३०
यात निसर्गामधील आकाश, पाणी, डोंगर, झाडे, प्राणी, पक्षी, फळे, फुले, माती इ. विषयावरील गाणी, गोष्टी, खेळ, क्राफ्ट घेतले जाईल. सर्व साहित्य आमच्याकडून देण्यात येईल.
फी: रू. ७५०/-
२. वारली पेंटिंग (नावनोंदणी १५ एप्रिल पर्यंत)
वयोगटः ८ ते १५ वर्षे
तारीखः २२ एप्रिल ते २६ एप्रिल
वेळः स. ११:१५ ते १२:१५
यात वारली चित्रकलेबद्दल माहिती देउन, आधी वहीमधे प्रॅक्टिस घेउन, मग कापडावर वारली पेंटिंग/भेटकार्डे इ. घेतले जाईल. फेविकॉल व काव यांचे मिश्रण करणे, कापड त्यात भिजवून वाळवणे इ. सर्व गोष्टींमध्ये मुलांचा सक्रिय सहभाग असेल.सर्व साहित्य आमच्याकडून देण्यात येईल.
फी: रू. ५००/-
३. ओरिगामी (नावनोंदणी १५ एप्रिल पर्यंत)
वयोगटः ८ ते १५ वर्षे
तारीखः २२ एप्रिल ते २६ एप्रिल
वेळः स. १२:१५ ते १:१५
यात ओरिगामीच्या वस्तु करून दाखवून, वर्तमानपत्राच्या कागदाने प्रॅक्टिस करुन मग चांगल्या कागदाच्या वस्तू करुन घेतल्या जातील. सर्व साहित्य आमच्याकडून देण्यात येईल.
फी: रू. ३५०/-
४. क्ले मॉडेलिंग (नावनोंदणी ३० एप्रिल पर्यंत)
वयोगटः ५ ते १० वर्षे
तारीखः ३ मे व ४ मे, ६ मे व ७ मे
वेळः स. १०:०० ते १२:००
टेराकोटा मातीच्या ४ वस्तू करुन घेतल्या जातील. ४ पैकी २ वस्तू भाजून दिल्या जातील. सर्व साहित्य आमच्याकडून देण्यात येईल.
फी: रू. ४००/-
५. हँडमेड पॉटरी (नावनोंदणी ३० एप्रिल पर्यंत)
वयोगटः १० ते १५ वर्षे
तारीखः ३ मे व ४ मे, ६ मे व ७ मे
वेळः सं. ४:३० ते ७:००
टेराकोटा मातीच्या ४ वस्तू करुन घेतल्या जातील. ४ पैकी २ वस्तू भाजून दिल्या जातील. सर्व साहित्य आमच्याकडून देण्यात येईल.
फी: रू. ९५०/-
६. हँडमेड पॉटरी (नावनोंदणी ३० एप्रिल पर्यंत)
वयोगटः ओपन, १५ वर्षापुढील कोणीही सहभागी होऊ शकेल.
तारीखः ५ मे
वेळः ११:०० ते ४:००
टेराकोटा मातीच्या २ वस्तू करुन घेतल्या जातील. २ पैकी १ वस्तू भाजून दिली जाईल. सर्व साहित्य आमच्याकडून देण्यात येईल.
फी: रू. ८००/-