माझं नाव मंदार मराठे आहे आणि मी एक चित्रकार आणि मूर्तिकार आहे.
येत्या गणेशोत्सवानिमित्त मी गणपती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेत आहे. या कार्यशाळेत मी शाडू माती पासून गणपती मूर्ती बनविण्याचे आणि रंगविण्याचे प्रशिक्षण देणार आहे. यात कोणत्याही साचा वापरला जाणार नसून मूर्ती पूर्णपणे हाताने बनविण्यास शिकवणार आहे.
कार्यशाळेच्या तारखा आणि वेळा :
कार्यशाळा १ : शनिवार ११ ऑगस्ट, रविवार १२ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळात. ( Saturday 11th August, Sunday 12th August and Saturday 1st Sept; 3:00 pm to 6:00 pm on all these days)
कार्यशाळा २ : शनिवार १८ ऑगस्ट, रविवार १९ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळात. ( Saturday 18th August, Sunday 19th August and Saturday 2nd Sept; 3:00 pm to 6:00 pm on all these days)
यासाठीची नोंदणी इथे ( http://studio.amhimarathe.com/index.php/register-for-a-workshop) चालू आहे.
मूर्तिकार मार्गदर्शक : मंदार मराठे
स्थळ: कोथरूड, पुणे
संकेत स्थळ (Website): www.amhimarathe.com