विख्यात साहित्यिक, विचारवंत् आणि थोर संवेदनशील माणूस श्री. पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा स्मृतीदिन प्रस्तुत समिती सातत्यपूर्वक गेली 32 वर्षे शिवाजी मंदिर, दादर येथे 13 ऑगस्ट या दिवशी साजरा करीत आली आहे. या वर्षी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. “दूरचित्रवाहिन्यांवरील मराठी कथाप्रधान कौटुंबिक मालिकाः उद्देश,वास्तविकता आणि परिणामकारकता” हा विषय असून वाहिन्यांचे आणि मालिकांचे स्वामी, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी होणार आहेत. मराठीतील उत्कृष्ठ साहित्य छोट्या पडद्यावर दिसावे, प्रेक्षकांच्या अभिरुचीला विकृत वळण लागू नये, समाजाची आदर्शहीन आणि नेतृत्वहीन अवस्था बदलण्याच्या दृष्टीने मालिकांनी आपला वाटा उचलावा म्ह्णून प्रेक्षक आणि माध्यमकार यांच्यात संवाद घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. अभिरुचीसंपन्न आणि समाजस्वास्थ्याला हितकारक अशा कार्यक्रमांची मागणी लावून धरण्यासाठी प्रेक्षक संघटित व्हावेत म्हणून असे संवाद-कार्यक्रम् राज्यात अनेक ठिकाणी घेण्याचा भावे समितीचा प्रयत्न राहील.
पालक ही संस्था हळूह्ळू प्रभावहीन होत आहे. मुलांवर मालिकांचे संस्कार होत आहेत. ते चांगले व्हावेत या तळमळीतून हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. आपण त्यात सहभागी व्हा.
संपर्क : प्रसाद करकरे
९८६७६१९१५३
संगणकीय पत्ता : bhavesamitee@gmail.com