Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

शिका सी प्रोग्रमिंग भाषा आता आपल्या मायबोलीतून आणि तेही घरात बसूनच

“Hello students…” अशी सुरवात करण्याऐवजी “नमस्कार विद्यार्थ्यांनो” अशी सुरवात करणं मला आवडेल. अर्थात कारणही तसचं आहे. आपण महाराष्ट्रातील… आपली मातृभाषा मराठी…अगदी साहीत्यीक भाषेत सांगायचे म्हणजे मायबोली… ईंग्रजी मध्ये ५ स्वर म्हणजेच (vowel) व २१ व्यंजने म्हणजेच (consonants) अशी एकुण २६ मुळाक्षरे….तर मराठीत १३ स्वर व ३१ व्यंजने अशी एकुण ४४ मुळाक्षरे…. अर्थात… मराठी अवघडच… एकीकडे इंग्रजी ही साहेबांची भाषा…. जगभर चालणारी….समजणारी…. तर मराठी आपण जन्मल्यापासुन कानावर पडणारी… इंग्रजी शिकण्याची धडपड संपत नाही पण प्रभुत्व येण्यासही वेळ लागतो…. मराठी आजुबाजुला सगळीकडेच आहे… आपण विचार मराठीतुन करतो….आपण उठल्या उठल्या मराठीच न्युजपेपर वाचतो…आपण उत्कृष्ट पणे मराठीतुनच भांडु शकतो… अहो इतकेच काय अर्वाच्य शब्द सुद्धा मराठीतुनच बोलले जातात व चांगले वजनदार सुद्धा असतात…! आपल्या कल्पनेच्या भराऱ्या मराठीतुनच होतात…स्वप्न आपल्याला मराठीतुनच पडतात…आई, वडील, मित्र, मैत्रीणी, नातेवाइक इत्यादी सर्वांच्या बरोबर मराठीतुनच संवाद साधतो… हं नाही म्हणायला आपण इंटरव्ह्यु, वायवा इंग्रजी मधुन देतो…. पेपर इंग्रजी मधुन लिहीतो…. इतकेच…. मराठी सनदी अधिकाऱ्यांची संख्या कधी वाढली ….तर मुलाखती सुद्धा मराठीतुन देण्याचे धाडस कोल्हापुरच्या भुषण गगराणी यानी प्रथम केल्या नंतर….. हा इतिहास आहे….!
आम्ही विचार केला…. कंप्युटरची एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजच आपल्या बांधवाना मराठीतुन शिकवली तर….? फ्रेंच अथवा जर्मन शिकायची असेल तर इंग्रजी चांगली लागते…. म्हणजेच एक भाषा शिकतांना दुसऱ्या भाषेची अडचण ही असतेच… हे सत्य नाकारता येणार नाही. मग त्याप्रमाणे कंप्युटर मधील एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकतांना इंग्रजी भाषेची अडचण तर सतावत नसेल ना….?

याच सर्व मर्यादा ओळखुन आम्ही सी लॅंग्वेज मराठीतुन शिकवण्याचा घाट घातला… सी चे सर्व चॅप्टर्स समाविष्ट करण्याव्यतिरीक्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच, नोट्स, प्रोग्रॅम्स इत्यादी सर्व काही एकाच फ्रेमवर्क मध्ये कव्हर केले आहे. विद्यार्थ्यांना करीअर करण्यास अतिशय आवश्यक अशा या सी भाषेचे मराठीतुन इ-लर्निंग करण्याचा आमचा हा निव्वळ प्रेमापोटीचा प्रयत्न… विद्यार्थी त्याला भरभरुन प्रतिसाद देतील ही आम्हाला खात्री आहे.

Classified-category: 
Location: 
कोल्हापूर
राजारामपूरी
कोल्हापूर ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.