"ये प्रिये.. गाणी त्या दोघांची" या अल्बमद्वारे मराठी संगीतरसिकांना एक वेगळी चव चाखायला मिळणार आहे आणि ती म्हणजे मराठी गीतांवर चढवलेल्या बंगाली स्वरसाजाची! या अल्बमद्वारे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध संगीतकार पानु रे आणि त्यांचे सुपूत्र सुरोजीत रे या दोन बंगाली संगीतकारांनी मराठीत पदार्पण केलयं. "ये प्रिये.. गाणी त्या दोघांची" या अल्बममध्ये ९ गाणी असून काही गाणी मॉर्डन तर काही गाणी सेमी क्लासिकल ढंगानी जाणारी आहेत! हृषिकेश आणि वैशाली यांनी गाणी उत्तम गायली असून त्यांचा आवाज Duet गाण्यासाठी एकमेकांना खूप साजेसा वाटतो. एकीकडे "चढलेली ही नशा" हे गीत तरूणाईला आकर्षित करणारं आहे तर दुसरीकडे "दिसे चांद सोवळा" किंवा "पाकळया रुसल्या" ही खास बंगाली बैठकीची सेमी-क्लासिकल गीत खास कानसेनांसाठी आहेत ! या अल्बमचं शीर्षक गीत "ये प्रिये" हे विरहगीत असून ते ऐकताना ए.आर रेहमानच्या "तू ही रे"ची आठवण आल्याशिवाय रहात नाही..
खास मायबोलीकरांसाठी हा अल्बम पुढील तीन दिवस (१० जून २०१२ पर्यंत) २५% सवलतीच्या किमतीत उपलब्ध असून उपलब्ध असून, सवलत मिळवण्यासाठी http://www.maanbindu.com/offers.jsp?coupon_code=maayboliad1 या लिंकला भेट द्यावी!