Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

इयत्ता दहावी हा विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा असतो. परिक्षेत अपेक्षित यश मिळविण्यासाठी अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहणे तितकेच आवश्यक आहे.

याच दृष्टीकोनातून "मैत्रलाईफ" या संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळा दादर, बोरीवली, डोंबिवली येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

पालक व मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या ताणतणावांचे नियंत्रण, संपूर्ण वर्षाच्या कालावधीत घ्यायची शरीराची काळजी व योग्य आहार यासंबंधी त्या त्या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतील.

यातील पहिली कार्यशाळा बोरीवली (प.) येथे दि. १० जून रोजी सकाळी १० ते ४ या वेळात भरवण्यात येईल. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी तसेच पुढील कार्यशाळांच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा.

मंजिरी वेदक: ९२२३५२५८६३ / ९२२३२४२०९५
MaitraLife@gmail.com

Location: 
बोरिवली, दादर, डोंबिवली मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.