मैत्रेयी फाऊण्डेशनतर्फे राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता आठवी ते दहावी हा शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटासाठी वेगवेगळे विषय ठेवण्यात आले असून त्यापैकी एका विषयावर निबंधलेखन पाठवायचे आहे. शालेय गटासाठी ‘बालरंगभूमीचे योगदान’, ‘भारतीय पक्षीजीवन’ आणि ‘बाबा आमटे : एक सेवाव्रती महापुरुष’ असे विषय आहेत. महाविद्यालयीन गटासाठी ‘गाव तेथे ग्रंथालय’, ‘व्याघ्रप्रकल्पांचे पर्यावरणीय महत्त्व’ व ‘काश्मीरचा बदलता इतिहास’ असे विषय ठेवण्यात आले आहेत; तर खुल्या गटासाठी ‘मातृगर्भातल्या ‘कळी’चे मनोगत’, ‘गुलजार : एक संवेदनशील कवी’, ‘अनाथाश्रमांचे अंतरंग’ आणि ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ असे चार विषय देण्यात येत आहेत.
ही राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा सशुल्क असून निकाल व विजेत्यांची नावे दूरध्वनी अथवा पत्रव्यवहाराने कळविण्यात येतील. पाच मार्चपर्यंत मैत्रेयी फाऊण्डेशन, चिनवाला बिल्डिंग, ३/बी/६६, नूरबाग, डोंगरी, मुंबई -४००००९ या पत्त्यावर निबंध पाठवावेत.
अधिक माहितीसाठी संस्थेच्या अध्यक्ष शर्मिला पाटील (९१७२२८०९७४), सरचिटणीस राहुल कुंभार (९१७२२७६१९०) यांच्याशी संपर्क साधावा.