निसर्गामध्ये (जंगलामध्ये) फिरत असताना अर्धवट माहितीवर व स्थानिक गाईडशिवाय फिरणे धोक्याचे असते. यामुळे आपल्याला पर्यटनाचा योग्य आनंद लुटता येणार नाही. आपले पर्यटन त्रासदायक ठरु शकते.
राधानगरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पर्यटन विषयक सुविधा मोठया प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. म्हणून आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आमचा हा नेचर क्लब कटिबद्ध आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये योग्य निसर्ग पर्यटनाचा आपण आनंद लुटु शकता. आम्ही पर्यटन व्यावसायिक नाही आहोत. स्व:ताचे नोकरी,व्यवसाय सांभाळत राधानगरीच्या निसर्गाचा तुम्हाला मनसोक्त लाभ घेता यावा ह्यासाठी हा आम्ही ह्या नेचर क्लब ची स्थापना केली आहे.
आम्ही आपल्या निवासाची,नाष्टा,भोजन, तसेच हवी असल्यास वाहनाची पण सोय अगदी माफक शुल्कामध्ये करतो. त्याच बरोबर स्थानिक गाईड, सर्व पर्यटन स्थळांची योग्य माहिती आम्ही आपणास उपलब्ध करुन देतो. आपण राधानगरी ह्या ठिकाणाहुन १ दिवसामध्ये होणारी कोल्हापुर दर्शन अथवा कोंकण दर्शन(सिंधुदुर्ग परिसर) ही सहल पण करु शकता. ह्यासाठीही आम्ही आपणास पुर्ण सहकार्य करतो. आम्ही आतापर्यत अनेक महाविद्यालये, शाळा, सोसायटी मंडळे, ट्रेकर्स ग्रुप, फँमिली यांच्या सहली यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. चला मग निसर्गसंपन्न राधानगरी मध्ये निसर्गपर्यटनाचा आनंद लुटायला.तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोतच.pls visit
www.radhanagari.in