www.sharpeners.in
या संकेतस्थळावर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आता शाळेव्यतिरिक्तचा आपला अभ्यास घरी बसून करता येणार आहे आणि तोही अधिक रंजक – आकर्षक स्वरुपात! मराठी, सेमी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटचा वापर सध्या वाढला आहे. मात्र फक्त मनोरंजनासाठी किंवा अधिक माहितीसाठी इंटरनेटचा वापर न करता अभ्यासासाठी त्याचा वापर व्हावा, या हेतूने ही वेबसाइट सुरु केली आहे. सीबीएसई किंवा आयसीएसई अभ्यासक्रमांसाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत मात्र राज्य शासनाच्या अभ्यासक्रमांसाठी फारशा साइट्स नाहीत हे लक्षात घेऊन या साइटची आखणी करण्यात आली आहे. शहरातील नामांकित शाळांमध्ये वीस वर्षाहून अधिक काळ अध्यापन केलेल्या शिक्षिका या वेबसाइटच्या विकसनात सहभागी झाल्या आहेत. अभ्यासाबरोबरच वाचनीय लेख, कोडी, सुडोकू आणि विविध गेम्सही साइटवर टाकण्यात आले आहेत.
संकेतस्थळावर पालकांसाठी खास मोड्युल्स तयार करण्यात आली आहेत. शहरातील विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या अलका साठे, दीप्ती देशपांडे, प्रतिभा भट, माधुरी कोल्हटकर, अमृता ढवळीकर, पूजा जाधव, जयश्री हांडे, लीना रानडे आदी शिक्षकांनी देखील या संकेतस्थळाच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला आहे. पुढच्या शैक्षणीक वर्षात १०वी ते १२वीचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा या संकेतस्थळाचा मानस आहे.