चित्रपटाच्या कपडेपटासाठी मदतनीस हवे आहेत.

चित्रपटाच्या कपडेपटासाठी मदतनीस माणसे.
एकूण जागा - २

एलिजिबिलिटी
१. शिक्षण - फॅशन, टेक्स्टाइल, नाटक, चित्रपट, आर्ट यापैकी कुठल्यातरी क्षेत्रातले असावे.
२. शूटींगच्या इथे कपडेपटात वावरायचा अनुभव असल्यास उत्तम.
३. कापडांबद्दल व रंगांबद्दल किमान माहीती, मापे घेता येणे हे यावे अशी माफक अपेक्षा
४. कपडेपट आणि वेशभूषेसंदर्भात शिकण्याचा कल. इच्छा असायला हवी.
५. मुंबईत वास्तव्य/ रहायची सोय.
६. वेळा अवेळांना काम करण्याची तयारी हवी.
७. कामासाठी मुंबई सोडून बाहेर जाण्याची तयारी हवी.
८. जेंडर नो बार
९. वयाची अट नाही पण २०-२२ वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे धावाधाव करण्यास फिट असायला लागेल.
१०. वर्ड किंवा एक्सेल मधे चार्टस बनवणे, इमेल्स पाठवणे, प्रिंट आउट काढणे इत्यादी बेसिक गोष्टी हातात बसलेल्या असाव्यात.

हे काम पूर्णवेळ आहे. शूटींगच्या आधी काही दिवस आणि शूटींगचे सगळे दिवस लोकेशनवर युनिटबरोबर असायला लागेल.
हे काम कॉश्च्युम असिस्टंटचे आहे. प्रचंड कष्ट करायला लागतील. पहिल्याच प्रोजेक्टमधे क्रिएटिव्ह काम करायला मिळणार नाही. पण त्याबद्दल शिकायला मात्र भरपूर मिळेल. कामाचा एकूण वेळ हा सध्या साधारण ५-६ महिने असेल. कामाच्या मोबदल्याबद्दल अनुभव आणि एफिशियन्सी चा अंदाज घेऊनच ठरवता येईल.
---------------------------------------

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी neerajacreations@gmail.com या ठिकाणी संपर्क साधावा.
धन्यवाद.

Classified-category: 
Location: 
विलेपार्ले
मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 54
Unique Pageviews (30 days): 53
Avg. Time on Page (30 days): 01:03