Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

'हौस मौज'- अभिनव फर्निचर व इंटेरियर शॉपी.

'हौस मौज'.
उत्तमोत्तम फर्निचरची हौस आणि बचतीतली मौज यांतील सुवर्णमध्य. सोप्या भाषेत, 'हौस मौज' म्हणजे एक अभिनव फर्निचर व इंटेरियर शॉपी.

'हौस मौज'मध्ये आम्ही तुम्हाला देतो- अभिजात आणि अभिनव डिझाईन्स, मनमोहक रंगसंगती, तुमच्या जागेच्या अत्युत्तम वापरामुळे तुम्हाला समाधान, सतत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दर्जाची वर्कमनशिप आणि हे सर्व अकही तुमच्याच बजेटमध्ये. आमचा अनेक वर्षांचा अनुभव, आमचे प्रशिक्षित टेक्निशियन्स व डिझायनर्स आणि तुमच्या खिशाची आम्हाला असलेली काळजी- यामुळेच हे सर्व शक्य होतं.

संपूर्ण किचन तुमच्या हाताशी आणण्याची कला, अधिकाधिक स्पेस युटिलिटी आणि युजर-फ्रेंडली किचन्स, कॅबिनेट्स व डायनिंग सेट्स ही 'हौस मौज'च्या किचन इंटेरियरची वैशिष्ठ्येच. प्रत्येक वस्तुला योग्य ती जागा, उप्लब्ध जागेचा पुरेपूर वापर, तुमच्या गरजा व बजेटचा विचार करून गुणवत्तेशी तडजोड न करता आम्ही डिझाईन करतो तुमच्यासाठी आदर्श व आधुनिक किचन.

'हौस मौज'च्या क्लासिक वॉर्डरोब्ज, परंपरा व आधुनिकता जपणार्‍या बेड्सची वाईड रेंज आणि तुमच्या गरजेनुसार तुमच्या बेडरूमचा वापर करणारे आमचे बेडरूम इंटेरियर तुमचे मन मोहून टाकतील, यात शंकाच नाही. अर्थातच इथेही आम्ही बजेट, उपयुक्तता आणि गुणवत्ता या सर्वांचा मेळ बसविणारे आमचे मूळ तत्त्व वापरतोच..!

लिव्हिंग रूम.. तुमच्या प्रतिष्ठेचा विषय. तुमच्या जीवनशैलीचा आरसाच. 'हौस मौज'ला तुमच्याइतकीच तुमच्या प्रतिष्ठेची आणि बजेटचीही काळजी आहे. इथे आहे तुमच्या निवडीला आणि कल्पनाशक्तीला वाव. बजेटमुळे राहून गेलेली मोहक सोफासेट्सची हौस आणि अत्याकर्षक आकारा-प्रकारांनी सजवलेला तुमचा हॉल बघण्यातली मौज आता पूर्ण कराच..!

आता सुतार, आर्किटेक्ट, आणि त्यांची अनंत नाटके; इंटेरियर करताना घरात होणारा प्रचंड, आवाज, धूळ, गोंधळ; लागणारा वेळ, हलका होणारा खिसा आणि सतत वाढणारा मनस्ताप हे सारे विसरा. साईट व्हिजिट होऊन इंटेरियरचं डिझाईन एकदा तुमच्या आमच्यात पक्कं झालं, की मग सारं काम आमच्या फॅक्टरीत आणि शेवटी थेट इन्स्टॉलेशन तुमच्याकडे.

फर्निचर, इंटेरियरपुरतंच आमचं काम आम्ही मर्यादित ठेवलेलं नाही. पीओपी, पेंटिंग व वॉलपेपर्स, इलेक्ट्रिफिकेशन, थीम लायटिंग, शोपीसेस आणि सजावट, पडद्यांसकट संपूर्ण फर्निशिंग- इत्यादी संपूर्ण कामही एखाद्या आपसात ठरलेल्या थीमप्रमाणे आम्ही करून देतो.

तुमच्या घरातल्या जागेचा पुरेपूर वापर करूनही सुटसुटीत पण तुमच्या आवडीच्या आकर्षक रचना तुमच्याच बजेटमध्ये ही तर 'हौस मौज'ची खासियत. तुमचे घर असो की ऑफिस, शॉप असो की शोरूम, तुमची व्यवसायाची जागा असो, की विरंगुळ्याची, तुमची जागा तुमच्यासाठी सर्वोत्तम होईल, ही 'हौस मौज'ची कमिटमेंट. खरं तर हे तुमचंच कर्तृत्व. आमचं कौशल्य, अनुभव पणाला लागला तरी आम्ही फक्त निमित्तमात्रच. कारण तुमचे घर तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने कोण जाणू शकेल?

'हौस मौज'
१, रोहन कॉर्नर, शिवतीर्थनगर, पौड रस्ता, पुणे.
फोन- (०२०)२५४४२२९२, ६५००७३१६
संपर्क- 'सुनिल गरूड'- ९८२२४०१७७८

Location: 
कोथरूड पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.