|| श्रीराम समर्थ ||
नामस्मरे निरंतर | ते जाणावे पुण्य शरीर||
महादोषांचे गिरीवर | रामनामे नासती ||
भारतवर्षाचे आद्य आदर्श आणि सकल समाज मान्य पूज्य दैवत म्हणजे श्रीरामचंद्र! प्रभू श्रीरामचंद्र जे आदर्श जीवन जगले ते खरेच किती अनुकरणीय आहे! त्याग, समर्पण, बंधुता, मित्रप्रेम, चारित्र्य, विनय, कर्तव्यनिष्ठा, गुरुभक्ती असे कितीतरी गुण श्रीरामाचे चरित्र आपल्याला शिकवते. श्रीराम हा आपला केवळ आदर्शच नव्हे तर संपूर्ण समाजधारणेचा प्राणच आहे जणू!
अशा पुण्यशील, दिव्य रामचंद्राचे स्मरण मात्रानेही आयुष्याचे सार्थक होते. त्याच्या निरंतर नामजपाने मनुष्य ईश्वरासमान होतो. श्रीरामरक्षेच्या निरंतर पठनानेही हजारो साधकांना हेच प्रत्ययास आले आहे. अशा स्वत: उमापतीने सांगितलेल्या या दिव्य स्तोत्राचे वाचन आणि पठन आपण केले पाहिजे. त्याचा अनुभव घेतला पाहिजे. जर आपणास श्रीरामरक्षा शिकायची असेल तर कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
९३२२४८२३०४ (व्हाटसअप्प व टेलिग्राम)
जे सहभागी होतील त्यांचा एक व्हाटसअप्प ग्रुप बनवला जाईल. ज्यांना मनापासून शिकायची आहे असेच जिज्ञासू, तळमळीचे आणि भक्त यांनी प्रवेश घ्यावा म्हणून आम्ही रुपये ५० इतके शुल्क प्रवेशासाठी आकारत आहोत. ८९७५०२५१२३ या क्रमांकावर Phonepe व Gpay उपलब्ध असून त्यावर शुल्क जमा केल्यानंतर तुम्हाला यात सहभागी होता येईल. ऑनलाईन अध्ययन वर्ग दररोज सायंकाळी ०७:१५ वा. घेण्यात येईल. याची सुरुवात दिनांक २१/०१/२०२१ रोजी होईल.
आपल्याला जर रामरक्षा येत असेल तर आपण ज्यांना ती येत नाही अशा जिज्ञासू व्यक्तींना, विशेषत: लहान मुलांना यासाठी प्रेरित करावे ही नम्र विनंती. श्रीराम सर्वत्र आहेच, आपण त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढवूया!
धन्यवाद.
|| श्रीराम ||