गच्चीवरील बागेसाठी पूर्ण वर्षभरासाठी उपयुक्त खत आणि कीडनाशक कीट ज्यात खालील गोष्टी मिळतीलः
१. घनजीवामृत (३ किलो)
२. शेणखत (४ किलो)
३. लेंडीखत (१ किलो)
४. नीम कीडनाशक (१ लिटर)
वापरण्याची विधी:
घनजीवामृतः १०० ग्रॅम घनजीवामृत १ लिटर पाण्यात रात्रभर भिजवावे आणि सकाळी गाळून रोपांवर फवारावे. उरलेला गाळ कुंडीत खुरपणी करून घालावा. महिन्यातून दोन वेळेस घनजीवामृत वापरायचे आहे. तीन किलो घनजीवामृत पूर्ण वर्षभर वापरता येते.
शेणखतः २०० ग्रॅम शेणखत १ लिटर पाण्यात भिजवून गाळून रोपांवर फवारणी करावी आणि उरलेला गाळ कुंडीमध्ये टाकावा. महिन्यातून एकदा वापरावे.
लेंडीखतः २० ग्रॅम लेंडीखत १ लिटर पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे आणि सकाळी गाळून कुंडीत टाकावे. पाणी गाळून उरलेला गाळ कुंडीत पसरून द्यावा. लेंडीखताचे प्रमाण कुंडीमागे अत्यल्पच असावे. महिन्यातून एकदा याचा वापर करावा. फुले येण्याच्या काळात महिन्यातून दोनदा वापरावे.
कीडनाशकः २० मिली कीडनाशक १ लिटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा संध्याकाळी फवारावे. रोपांवर कीड असेल तर आठवड्यातून एकदा फवारणी करावी.
पूर्ण किट फक्त १००० रुपयांमध्ये. सध्या नवी मुंबई, मुंबई आणि उपनगरी भागात सेवा उपलब्ध आहे.