कोरोनामुळे केवळ जीवनावश्यक गोष्टींची मालवाहतूक चालू आहे, मात्र त्यामुळे शिकणे थांबू शकत नाही. झूम/गुगल मीट, व्हाईटबोर्ड आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने Goethe-Institut व telc ह्या संस्थांचे CEFR A1, A2, B1 Exam चे कोर्स आम्ही आता पूर्णपणे ऑनलाईन चालू करत आहोत.
त्याकरिता लागणारे अभ्यासाचे वर्कशीट्स, इत्यादी तुम्हाला आम्ही मेल करू आणि गूगलवर स्प्रेडशीटच्या माध्यमाने तुम्हाला वेळापत्रही पाठवू ज्यांत तुम्ही तुमच्या सूचना किंवा प्रश्न (विशेषतः गृहपाठ करताना) लिहू शकाल.
आम्ही आंतरजालावर असलेल्या वर्कशीट्स वापरतो ज्या रॉयल्टी, कॉपीराइट/प्रताधिकार मुक्त आहेत. तसेच कोर्ससाठी लागणारी पुस्तके तुम्हाला भारतात आम्ही मोफत पाठवतो.
केवळ व्हिडीओ कॉलने शिकणे थोडे अवघड जाते, त्यासाठी आम्ही ग्राफिक्स टॅबलेटच्या साहाय्याने व्हाईटबोर्ड वापरून तुम्हाला एका वर्गात बसल्याचा अनुभव देतो.
CEFR A1, A2, B1 च्या कोर्सेसची अत्यावश्यक माहिती जसे कि एका लेव्हलसाठी लागणारा वेळ, अभ्यासक्रम, परीक्षेचा फॉरमॅट, तसेच लवकरच जर्मनी, ऑस्ट्रिया तसेच स्वित्झर्लंडला जाणाऱ्या शालेय मुलांसाठीचा कोर्स, अशी सर्व माहिती ह्या (https://docs.google.com/document/d/1UOT6tJB_f7CemPBYRxOmCh87nn2ktpif5vMSDwrOZio/edit?usp=sharing) लिंकवर तुम्हाला मिळेल.
संपर्क: ऐश्वर्या Call: ९३२१६ १४८५६ । WhatsApp: ७०२१८ ०७२७४
(कधी वर्गात असताना फोन घेणे शक्य होत नाही, तेव्हा कृपया WhatsApp करा जेणेकरून तुम्हाला एकाच वेळी सगळे प्रश्न विचारता येतील आणि मला शंकानिरसन करणे सोपे जाईल.)