मी एक नवा मेसेंजर लॉंच केला आहे. मागचे काही वर्षे मी यासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे/घेतो आहे. हा मेसेंजर स्मार्टफोन तसेच टॅबलेटवरूनसुद्धा वापरता येईल. आणि मुख्य म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमचा फोन नंबर किंवा इमेल आयडी देण्याची आवश्यकता नाही. तुमचे नाव (किंवा तुम्हाला जे नाव धारण करायचे आहे ते) आणि तुमचा एखादा लक्षात राहण्यासारखा नंबर इतकेच फक्त पुरेसे आहे :) केवळ तेवढ्या आधारे KnowMe तुमचा अॅड्रेस बनवेल जो तुम्ही मायबोली अथवा तत्सम सोशल साईटवर प्रसिद्ध करू शकता. तो वापरून इतर सभासद तुमच्याशी KnowMe मेसेंजरवर चाटिंग करू शकतील. शिवाय हा पूर्णपणे मोफत आहे तसेच यात जाहिराती पण दाखविल्या जात नाहीत. आहे ना इंटरेस्टिंग? :)
सध्या फक्त अॅंड्रॉईड फोन/टॅबलेटच हा मेसेंजर उपलब्ध आहे आणि तो गुगल प्लेस्टोअर मधून इन्स्टॉल करता येईल. त्यासाठी प्लेस्टोअरमध्ये जाऊन "KnowMe Messenger" सर्च करा. अन्यथा KnowMe च्या या वेबसाईटवरून:
https://www.knowme.co
किंवा प्लेस्टोअरच्या या थेट लिंकवरून सुद्धा तुम्हाला तो इन्स्टॉल करता येईल.
https://goo.gl/zrdcC5
जसे कि तुम्ही प्लेस्टोअर मध्ये पाहू शकता सध्या दहा हजारहून अधिक जणांनी हा मेसेंजर डाऊनलोड केलेला आहे.
पण KnowMe हा केवळ फारशा परिचित नसलेल्या लोकांशी व्यक्तिश: संवाद साधने इतक्या पुरता मर्यादित मेसेंजर नाही. यात इतर अनेक सुविधा आहेत:
१. तुमची प्रोफाईल: एखादी अनोळखी व्यक्ती बाबत आपण जे काही पाहू शकतो व जाणू शकतो (तुमचे अंदाजे वजन/उंची/रंग इत्यादी) तेवढीच माहिती KnowMe मध्ये तुमच्या प्रोफाईल मध्ये आवश्यक म्हणून विचारली आहे. इतर माहिती ऐच्छिक आहे.
२. तुमचे ठिकाण व शेजारी: KnowMe ला तुम्ही तुमचे ठिकाण (Location) समजून घ्यायची परवानगी दिलीत तर तुमच्या जवळपासच्या KnowMe मेम्बर्सना तुम्ही (व तुम्हाला ते) लिस्टमध्ये दिसतील. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या उद्योग/व्यवसाय/सर्विसची माहिती जवळपासच्या इतर मेम्बर्सना होण्यासाठी करता येईल. (Location ला परवानगी देऊन ते "दाखवू नये" हा पर्याय निवडला तर तुम्ही शेजारी आहात ते इतर मेम्बर्सना दिसेल पण नक्की कुठे ते दाखवले जाणार नाही)
३. पोस्ट्स: KnowMe Messenger चे हे एक वैशिष्ट्य कि जिथे तुम्ही तुमच्या पोष्ट्स बनवू शकता. जेणेकरून नवीन व्यक्तीला तुमच्या विषयी अधिक जाणून घेणे सोपे जाईल.
४. प्रायवसी: जसे आधीच उल्लेख केला आहे कि हा मेसेंजर बहुतांशी फारसे परिचित नसलेल्या (पण परिचित होऊ पाहणाऱ्या) लोकांसाठी आहे. त्यामुळे प्रायवसी फार महत्वाची आहे. तुम्हाला कोणी मेसेज पाठवावेत, तुमची प्रोफाईल व तुमचे ठिकाण कोणाला पाहता येईल इत्यादीवर तुम्ही नियंत्रण करू शकता. अगदीच कोणी त्रास देऊ लागले तर त्यांना तुम्ही ब्लॉकपण करू शकता जेणेकरून नंतर त्यांना व तुमचा या मेसेंजरवर कसलाही संबंध येणार नाही.
५. ग्रुप्स: KnowMe मध्ये आपण दोन प्रकारचे ग्रुप्स बनवू शकतो Private आणि Public. या दोन्हीत फरक इतकाच कि Public ग्रुपचा तुम्ही एक अत्यंत सोपा असा आयडी बनवू शकता. हा पत्ता तुम्ही इतरांना दिलात तर ते आपणहून तो ग्रुप जॉईन करू शकतील. हेच जर तो ग्रुप Private असेल तर त्याला मात्र असा आयडी नसेल. तुम्ही (Admin) ज्यांना add कराल तितकेच जॉईन होतील. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रुप कोणत्याही प्रकारचा असो (Private किंवा Public) त्या ग्रुप मधील मेम्बर्सना एकमेकांचे ठिकाण (location) अथवा प्रोफाईल दिसावी कि नाही यावरही नियंत्रण करते येते. याशिवाय, तुम्हाला हवे असेल तर हे ग्रुप्स असे पण बनवता येतात कि जिथे फक्त ग्रुप्सचे Admin पोष्ट्स टाकू शकतात व इतरांना त्या फक्त वाचता येतील. एखादा ग्रुप भरपूर लोक झाले व सर्वच जण तिथे पोस्ट करू लागले कि गोंधळ होऊ शकतो. म्हणून हि सोय. आहे ना इंटरेस्टिंग? :)
उपयोग:
KnowMe Messenger चा तुम्ही विविध प्रकारे वापरू शकता. जसे कि....
१. मायबोली सारख्या सोशल साईटवर:
तुमच्या मायबोलीच्या प्रोफाईलमध्ये "माझ्याबद्दल" मध्ये तुम्ही KnowMe अॅड्रेस देऊ शकता जेणेकरून इथल्या अन्य सभासदांना तुम्हाला KnowMe वर मेसेज करता येईल. अर्थातच तुमच्या फोन नंबर किंवा फेसबुक व इमेल अड्रेस वगैरे शिवाय तुम्ही इतरांशी चाट करू शकाल.
२. तुमच्या व्यवसायासाठी:
तुमच्या ग्राहकांना तुम्ही KnowMe चा पत्ता दिलात कि ते तुमच्याशी संपर्क तर साधू शकतीलच, पण तुमच्या वॉलपोस्ट वाचून तुमच्या व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती त्यांना लगेच मिळू शकेल.
३. ग्राहकांची रांग हाताळण्यासाठी:
अनेक ठिकाणी रांगा असतात आणि ग्राहक तिथे तिष्ठत बसलेले असतात. अशा ठिकाणी KnowMe खूप उपयोगी आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही डॉक्टर आहात व तुमचे क्लिनिक आहे. अनेक रुग्णांना तिथे तिष्टत बसावे लागते. KnowMe मध्ये Quick Status Update आहे. तिथे तुम्ही पटकन सध्याच्या रुग्णाचा नंबर अपडेट करू शकता. मग इतर रुग्णांना घरबसल्या अजून किती नंबर मध्ये आहेत हे कळू शकेल. जेणेकरून ते आपला नंबर येण्याच्या काही वेळ आधी क्लिनिकमध्ये येतील. (तुम्ही KnowMe ला लोकेशनची परवानगी दिली असेल तर आसपास राहणाऱ्या रुग्णांना KnowMe मधल्या Neighbors लिस्टमध्ये तुमच्या क्लिनिकच्या नावाखालील स्टेटसमध्ये सध्याच्या रुग्णाचा नंबर दिसेल)
४. कोण कोठे आहेत ते पाहण्यासाठी:
दूर सहलीला गेलेले तुमच्या कुटुंब वा मित्रपरिवारातील तुमचे प्रियजन असोत किंवा फिरतीवर राहून काम करणारे तुमचे एम्प्लॉयी असोत, अनेकदा तुम्हाला ते सध्या कुठे आहेत हे पट्कन पहायचे असते. KnowMe मेसेंजर वर या सर्वांचा एक ग्रुप केलात आणि त्यामध्ये Group members can see each others location हा पर्याय निवडलात कि ग्रुपमधले सर्वजण सध्या कुठे कुठे आहेत हे तुम्हाला पाहता येईल. विशेष म्हणजे या ग्रुप मधल्या मेम्बर्सनी आपल्या प्रोफाईल मध्ये स्वत:चे लोकेशन दाखवू नये हा पर्याय निवडला असेल तरीही त्यांचे लोकेशन त्या ग्रुपपुरते दिसत राहील. म्हणजेच केवळ ठराविक लोकांनाच आपले लोकेशन दिसेल अशी सोय इथे आहे.
५. तुमच्या संस्था/कंपनी/संघटना मध्ये नोटीसबोर्ड प्रमाणे:
तुमची शैक्षणिक अथवा गृह अथवा अन्य कोणतीही संस्था/कंपनी/संघटना असो. अनेकदा अशा ठिकाणी एखादी नोटीस कागदी प्रिंट काढून विविध बिल्डिंगवर चिकटवावी लागते. शिवाय कोणी मेम्बर बाहेरगावी गेले असतील तर त्यांना हि नोटीस कळतही नाही. अशा केस मध्ये तेथील व्यवस्थापन KnowMe Mesenger वापरून एक पब्लिक ग्रुप बनवू शकते आणि फक्त त्याचा अॅड्रेस सर्व मेम्बर्सना एकदा कळवला कि झाले. ते सारे स्वत:हून जॉईन होतील. त्यानंतर अशा ग्रुप मध्ये "Only admin can post" हा पर्याय निवडला कि व्यवस्थापन साऱ्या नोटीस या ग्रुपवर पोस्ट करू शकतात.
अशा खूप प्रकारे हा मेसेंजर वापरता येऊ शकतो. Stay safe, stay connected, stay informed, stay communicated अशा प्रकारे सर्व सोयी ज्यात आहेत असा भविष्यातील एक परिपूर्ण मेसेंजर बनवण्याचा माझा मानस आहे. आणि केवळ तुम्हा सर्वांच्या सहकार्यानेच तो पूर्ण होईल :)
सध्याच्या व्हर्जन मध्ये या मर्यादा आहेत:
१. व्हिडीओ किंवा पीडीएफ वगैरे पाठवण्याची सोय अद्याप नाही.
२. चाटिंग मध्ये एकाच वेळी अनेक मेसेजेस डिलीट करणे तसेच फोरवर्ड करणे हे अजून केलेलं नाही.
३. या व्हर्जन मध्ये ग्रुपमध्ये तीनशे ते चारशे सभासद जॉईन होऊ शकतात. हिच मर्यादा लाखो किवा त्याहून जास्त करण्यावर सध्या काम सुरु आहे.
४. सध्या हा मेसेंजर फक्त अॅंड्रॉईडवर उपलब्ध आहे.
आपण जास्तीतजास्त सर्वांनी हा मेसेंजर वापरावा अशी माझी विनंती आहे. तुमचा फीडबॅक खूप महत्वाचा आहे.