Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

डॉ. भारत गंगाधर करडक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अधिसभा निवडणुक २०१७

https://www.facebook.com/DrBharatKardak/

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अधिसभा निवडणुक २०१७ (मतदान :रविवार 19/11/2017)

# कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक

सन १९४९ साली तत्कालीन पुणे विद्यापीठ (सध्याचे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ) स्थापन झाले. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्रात ऊस, दुध आणि कापुस पिकांच्या माध्यमातुन सहकाराच्या मार्गाने समृद्धी आली. साखर कारखानदारीच्या भोवताली शिक्षणाची मंदिरे उभी राहिली. (पुढे त्याची संस्थाने झाली. ) शेतकर्‍यांच्या ऊसातुन प्रतिटन १० रुपये कपात करुन ही संस्थाने बहरली. त्यातील महाविद्यालये या विद्यापीठाला संलग्न झाली. परंतु ऊसाच्या फडातील शेतकरी मात्र अपवाद वगळता विद्यापीठात पोहचु शकला नाही. शिक्षणाचे सार्वत्रिकरण करत असताना शिक्षणाचा उपयोग या शेतकर्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी किती केला गेला हा संशोधनाचा विषय आहे.

म्हणुन चिखला मातीतील शेतकर्‍यांची शिकलेली पोरे शिक्षणाच्या सर्वोच्च मंदिरात गेली पाहिजेत, शिक्षणातुन रोजगार निर्मीती झाली पाहिजे, आर्थिक साक्षरता आणि सुबत्ता आली पाहिजे, विद्यापीठातील शिक्षणाचा उपयोग शेतकर्‍यांच्या जिवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी झाला पाहिजे, ही भुमिका घेवुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे च्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीमध्ये सर्वसाधारण जागेवर उभे राहिलेल्या "डॉ. भारत गंगाधर करडक" (एम. एस्स्सी. रसायनशास्त्र, पी.एच.डी.- स्पेन, पोस्ट डॉक्टरेट- ऑस्ट्रेलिया)(माजी प्रभारी प्राचार्य - प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेवगांव) यांच्या भुमिकेला अनुमोदन / पाठिंबा देणारा हा एक नोंदणीकृत पदवीधर शेतकरी राजा !

मतदान करताना: "नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील" सर्वसाधारण जागेवरील डॉ. भारत गंगाधर करडक यांचे नावासमोर एक (१) असा पसंतीक्रम लिहावा. (मतदान :रविवार 19/11/2017)

विनंती: सदर पोस्ट आणि पेज दोन्ही "लाईक" करावे. नंतर सदर पोस्ट व पेज दोन्ही आपल्या मित्रांमधे "शेअर "करावे.

# कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक (कुणबी = शेतकरी)
#सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
#अधिसभा निवडणुक २०१७
#डॉ. भारत गंगाधर करडक
#सर्वसाधारण, अहमदनगर
#नोंदणीकृत पदवीधर मतदार संघ
#सिनेट निवडणुक २०१७
#Senate Election 2017
#SPPU Pune University
#Savitribai Phule Pune University
#Dr Bharat Kardak
#PhD Spain
#Post Doctorate Australia
#Ex Principal

Classified-category: 
Location: 
अहमदनगर, पुणे, नासिक ४११००१ पुणे , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.