चिंचवड देवस्थान ट्रस्ट सर्वेअर भूमापक व ज्युनिअर वकिलांची नेमणूक करणे आहे.

सर्वेअर भूमापक:
चिंचवड देवस्थान ट्रस्ट हा नोंदणीकृत न्यास असून न्यासाच्या नावांची आवश्यक ती कागदपत्रे जमा करून त्याची नोंद करून त्याचे रेकॉर्ड ठेवणे, ट्रस्टने वहितीसाठी दिलेल्या जमिनीचे खंड तपासणे, ते वसूल करणे, त्याचे रेकॉर्ड ठेवणे, अतिक्रमण झालेल्या जागांबद्दलचा अहवाल सादर करणे, जमीन मोजणीचे वेळी हजार राहणे / मालकी हक्काचे ७/१२ चे अद्ययावत उतारे आणणे इत्यादी कामे करण्यासाठी अनुभवी व माहितगार व्यक्ती नेमणे आहे.
ज्युनिअर वकील:
देवस्थानच्या जमिनी वा अन्य सिव्हिल /क्रिमिनल संदर्भात चालू असलेल्या दाव्यामध्ये सिनिअर वकिलांना मदत करणे, आवश्यक ती कागदपत्रे जमा करणे, न्यायालयातील कागदपत्रे निकालांच्या सत्यप्रती काढणे, देवस्थान ट्रस्टचे वतीने छोटे दावे दाखल करून चालविणे, किरकोळ करार मदार तयार करून ते नोंदणीकृत करणे, धर्मादाय आयुक्त कार्यालयात चेंज रिपोर्ट दाखल करणे इत्यादी कामासाठी ज्युनिअर वकिलांची नेमणूक करणे आहे. उमेदवारांनी आपली संपूर्ण माहिती असलेला अर्ज
दिनांक: १० मार्च २०१७, संध्याकाळी ६ वा. पूर्वी खालील ई-मेल वर पाठवावा .
ई-मेल : chinchwaddeosthantrust@gmail.com, anil@arkinc-design.com

Classified-category: 
Location: 
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्री मंगलमूर्ती वाडा
चिंचवड गाव श्री मंगलमूर्ती वाडा
४११ ०३३ पुणे , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): -