चिंचवडला ४ डिसेंबरला ज्योतिष वर्ग सुरु होत आहे.
सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यास करुन विशेष पात्रता मिळवण्याचा विचार करत असलेल्या किमान १२ वी किंवा जुनी ११ वी पास असलेल्या सर्व स्त्री व पुरुषासाठी चिंचवड येथे ज्योतिषवर्ग सुरु होत आहे. वर्ग सुरु होण्याची संभाव्य तारिख ४ डिसेंबर २०१६ रोजी आहे. वर्गाचा कालावधी आठवड्याला दोन तास असे पन्नास आठवडे म्हणजे एक वर्ष असेल. अभ्यासु व्यक्तीच्या सोयीने वर्ग शनिवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळ असा असेल. हा वर्ग झाल्यावर एक छोटीशी परिक्षा होऊन आपल्याला प्रमाण पत्र मिळेल.
नोकरी न करणारा करणारा महिला वर्ग किंवा नुकताच सेवानिवृत्ती घेऊन निवृत्त आयुष्याची आखणी करणारे तसेच तरुण पुरुष महिला यांनाही या वर्गात प्रवेश आहे. आपण या वर्गात प्रवेश घेऊन एका वर्षाने ज्योतिष सल्लागार बनु शकता किंवा या अभ्यासाने समाजाबरोबर उत्तम संवाद निर्माण करु शकता आणि आपले स्थान मिळवु शकता.
या वर्ग यशस्वी रित्या पुर्ण केल्यावर खालील सेवा आपण सहजपणे खालील सेवा उपलब्ध करुन देऊ शकाल.
१. नुकत्याच जन्मलेल्या बालकाची जन्मकुंडली संगणकाच्या सहायाने बनविणे किंवा अन्य कोणत्याही वयाच्या व्यक्तीची जन्मकुंडली बनविणे.
२. नविन जन्माला आलेल्या बालकाची रास, नक्षत्र आणि त्यानुसार नक्षत्र नावाचे अद्याक्षर सांगणे.
३. जन्माला आलेल्या बालकाला जर जननशांतीची आवश्यकता असेल तर सांगणे.
४. साप्ताहीक, मासीक यासाठी साप्ताहिक राशी भविष्य लिहणे.
५. लग्नासाठी विवाहगुण मेलन तसेच मंगळ दोष इ. पाहुन विवाह करण्याचा निर्णय देणे.
६. प्रश्न कुंडली मांडुन त्याच्या आधाराने प्रश्नाचे उत्तर देणे.
७. साडेसाती कधी असते व त्याच्या अनुषंगाने उपासना काय करावी याचे मार्गदर्शन.
८. इतर प्रश्नांची हाताळणी जसे विवाह कधी होईल, पत्रिकेत असणारे शुभयोग व त्याद्वारे उत्तम काळ मार्गदर्शन इ.
९. विवाह, उपनयन व इतर कामासाठी मुहुर्त काढणे.
१०. प्रश्नकर्त्याला उपासना सांगणे.
या वर्गाचे ठिकाण तसेच फ़ी किती असेल हे माहित करुण घेण्यासाठी फ़ोन करा किंवा फ़ोन करुन प्रत्यक्ष भेटा. फ़ोन : 9763922176
भेटीचा पत्ता : नितीन जोगळेकर - सज्जन प्लाझा बेसमेंट, हिंदुस्थान बेकरी समोर, राहुल साडीज शोरुमच्या खाली, चाफ़ेकर चौकाजवळ
चिंचवड पुणे - ४११०३३
नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहे. ह्या अंकाच्या वाचनासाठी कोणतेही मुल्य नाही. ज्योतिष विषयाच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही सेवा निशुल्क आहे. या अंकामधे मधे ज्योतिष विषयक लेख आहेत जे सर्व सामान्य वाचकांना समजतील. या शिवाय वार्षीक राशीभविष्य सुध्दा आहे. http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_16.html .